दिमाखात रंगला ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टार प्रवाहवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे. पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला.

रेड कार्पेटवरचा कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधणारा होता. एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो, पण या पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला. खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा 4 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.