राज्य सरकारी कर्मचाऱ्य़ांना वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
state-government-office-new

राज्य सरकारने मंकरसंक्रांतीच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्य़ांना खूशखबर दिली आहे. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्य़ांना तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्य़ांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता वाढ देण्याचे राज्य सरकारचेही धोरण आहे. पण जानेवारी ते नोव्हेंबर 2019 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मिळाली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता.

या मागणीचा विचार करून राज्याच्या वित्त विभागाने जानेवारी ते जून 2019 या कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची सहा महिन्यांची थकबाकी देण्याचा शासननिर्णय राज्याच्या वित्त विभागाने प्रसिद्ध केला आहे. महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. पुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, डॉ. सोनाली कदम, नितीन काळे, विनायक लहाडे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.