
मुंबईतीत रेल्वे वाहतुकीत आमूलाग्र बदल करणाऱया एमयूटीपी टप्पा-3 प्रकल्पासाठी 13 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास वितरित करण्यास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेत सुधारणा करण्यासाठी मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) टप्पा-3 हा तब्बल 10 हजार 947 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आखण्यात आला आहे. रेल्वेच्या सहभागाने मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) एमयूटीपी टप्पा-1 व टप्पा- 2 च्या धर्तीवर टप्पा-3 हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये पेंद्र सरकारचा पन्नास टक्के व राज्य सरकारचा पन्नास टक्के आर्थिक वाटा आहे.
या प्रकल्पाअंतर्गतची कामे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इव्हेस्टमेंट बँकेच्या (एसआयआयबी) आर्थिक सहाय्यातून करण्यात येणार असून त्यासाठी एसआयआयबीने साडेतीन हजार कोटी रुपये कर्जही मंजूर केले आहे. हे कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. मध्यंतरी राज्य सरकार एमआरव्हीसी, एमएमआरडीए व सिडकोच्या दरम्यान सामंजस्य करारही झाला आहे.
या प्रकल्पाचे फायदे
या प्रकल्पातून पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व हार्बर मार्गावर अत्याधुनिक सिग्नलसाठी सीबीटीसी यंत्रणा एमआरव्हीसीकडून बसविण्यात येणार आहे. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि पनवेल तसेच चर्चगेट त विरार या स्थानकांदरम्यान ही यंत्रणा बसवण्यात येईल.
19 स्थानकांचा विकास
या प्रकल्पाअंतर्गत पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल, खार, जोगेश्वरी, कांदिवली, मीरा रोड, भाईंदर, वसई, नालासोपारा, हार्बर मार्गावर जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द आणि मध्य रेल्वेवरच्या भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, शहाड, नेरळ व कसारा रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे.
- लोकल सेवेत आमूलाग्र बदल होणार
- लोकल अधिक वेगवान
- 19 स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार
- एमयूटीपी टप्पा तीन प्रकल्प
- पनवेल ते कर्जतदरम्यान नवीन रेल्वे लाइन – खर्च 2 हजार 783 कोटी रुपये
- ऐरोली ते कळवादरम्यान एलिव्हेटेड रेल्वे मार्ग, खर्च- 476 कोटी रुपये
- विरार ते डहाणू मार्गाचे चौपदरीकरण, खर्च – 3 हजार 578 कोटी रुपये
- मुंबईकरांसाठी 47 एसी लोकल ट्रेन, खर्च 3 हजार 411 कोटी रुपये
- रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी 551 कोटी रुपये
- तांत्रिक सहाय्यापोटी 69 कोटी रुपये































































