
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने 25 व्या महाराष्ट्र कबड्डी दिनाचे औचित्य साधत पुरस्कारांचा वर्षाव केला असून आपल्या मैदानावरच्या वृत्तांकनाने अन्यायाविरुद्ध वाचा पह्डत खेळाडूंच्या न्यायासाठी झगडणाऱया दै. ‘सामना’च्या विठ्ठल देवकाते यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार जाहीर केला आहे. तसेच रामभाऊ घोडके यांना यंदाच्या ‘कबड्डी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाईल. त्याचप्रमाणे गेली पाच दशके कबड्डीसाठी झटणाऱया जया शेट्टी यांना ‘कृतज्ञता’ पुरस्काराने गौरविले जाणार असल्याची माहिती संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे. येत्या 15 जुलैला रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने पोयनाड (रायगड) येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
गेली 25 वर्षे ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांचा 15 जुलै हा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा केला जात असून त्यानिमित्ताने राज्यातील कबड्डी संघटक, खेळाडू आणि क्रीडा पत्रकारांना पुरस्काराने गौरविण्यात येते. याही वेळी संघटनेने कबड्डी दिनी पुरस्कारांची उधळण करीत सुमारे 50 पेक्षा अधिक पुरस्कार जाहीर करत सर्वांना खूश केले आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाचा जीवन गौरव मिळालेल्या शकुंतला खटावकर, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पंकज मोहिते, विराज लांडगे, अस्लम इनामदार, आकाश शिंदे, शंकर गदई, अंकिता जगताप, पूजा यादव, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती संघनायिका सोनाली शिंगटे व आम्रपाली गलांडे यांचाही सन्मान केला जाणार आहे.
कबड्डी दिन पुरस्कार
कबड्डी जीवन गौरव पुरस्कार ः राम घोडके ; कृतज्ञता पुरस्कार ः जया शेट्टी, नरेश म्हस्के श्रमयोगी कार्यकर्ता ः जे.जे. पाटील, प्रभाकर लकेश्री; पाटील–साटम पुरस्कार ः संकेत सावंत, मंदिरा कोमकर; क्रीडा पत्रकार पुरस्कार ः विठ्ठल देवकाते (दै. ‘सामना’), सुनील सकपाळ (दै. ‘पुढारी’); ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार ः जीवन पैलकर (मुं. शहर); ज्ञानेश्वर कुंभार(उपनगर); रवींद्र देसाई (ठाणे), नामदेव राठोड (हिंगोली), कुमुद कागलकर (सांगली), भास्कर सूर्यवंशी (लातूर), चंद्रकांत काटे (पुणे), नलिनी खेडेकर – पवार (पुणे), दिलीप देवलकर (मुं. शहर); ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार ः मंगेश गुरव (उपनगर), मंगेश मोरे(रत्नागिरी), प्रा. चंद्रकांत सातपुते (परभणी), प्रवीण दळवी(ठाणे), प्रकाश पवार(पुणे); ज्येष्ठ पंच पुरस्कार ः प्रकाश चव्हाण (मुं. शहर), सुरेश जोशी (ठाणे), श्रीकांत चतुर (जळगाव),बळीराम सातपुते (अहिल्यानगर), नवनाथ भालेराव (परभणी), पद्माकर मदन(उपनगर); मल्हारपंत बावचकर पुरस्कार ः अजित चौहान व समरीन बुरोंडकर; उत्पृष्ट जिल्हा पुरस्कार ः पुणे जिल्हा; किशोर गट शिष्यवृत्ती ः तुकाराम दिवटे (जालना), किशोर जगताप (परभणा), सारंग उंडे (नंदुरबार) ; किशोरी गट शिष्यवृत्ती ः बिदिशा सोनार (नाशिक), सेरेना म्हसकर (उपनगर), यशश्री इंगोले (परभणी); कुमार गट शिष्यवृत्ती ः आफताब मन्सुरी (ठाणे), अनुज गावडे (पुणे), समर्थ देशमुख (कोल्हापूर); कुमारी गट शिष्यवृत्ती ः वैभवी जाधव (पुणे), वैष्णवी काळे (अहिल्यानगर), भूमिका गोरे – (पुणे).