सह्याद्री अतिथीगृहात झाली विशेष बैठक, शरद पवारांनी दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
state-meeting

सह्याद्री अतिथीगृहामध्ये बुधवारी एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्त्वाची चर्चा करण्यात आली. याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.

‘सर्वोच्च न्यायालयाने 97 व्या घटना दुरूस्तीसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सहकार कायद्यात करावयाच्या सुधारणांबाबत व बँकिंग नियमन अधिनियमात केंद्र शासनाने केलेल्या सुधारणांचा सहकारी बँकांवर होणारा परिणाम याबाबत आज सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली’, अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे.

या बैठकीस राज्याचे उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्रिगण यांच्यासह सहकार क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.