किनारपट्टी भागाला पावसाने झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । गुहागर

रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला पावसाने गुरूवारी अक्षरशः झोडपले. यामुळे गुहागर शहरासह अनेक भागात पाणी घुसले. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असुन रात्रीपासून किनारपट्टी भागात पावसाने प्रचंड झोड उठवली.

गुहागर वेळणेश्वर हेदवी या तालुक्याच्या भागात याची तीव्रता जास्त होती. किनारपट्टीवरील अनेक भागात पाणी भरले. तर गिमवी मुंढर या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे प्रकार घडले. तर अनेक ठिकाणी पडझडही झाली आहे तालुक्यालतही मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडविली. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक बंद झाली होती. विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठाही खंडित झाला होता. तर ग्रामीण भागातील वहाळ, नद्या तुडूंब भरुन वाहत होत्या. पडलेल्या पावसामुळे कुठेही नुकसान झालेले नाही.