संघर्षातून यशाकडे; कला दिग्दर्शक देवदास भंडारे यांची भरारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संघर्षातून यशाकडे, असा कला दिग्दर्शक देवदास भंडारे यांचा प्रवास आहे. चिपळूण तालुक्यातील पुंभार्ली बौद्धवाडी येथील एका सामान्य कुटुंबातील भंडारे यांनी मुंबईत आल्यावर अनेक स्तरांवर धडपड करत आज सिनेसृष्टीत कला दिग्दर्शक म्हणून स्थान निर्माण केले आहे. हिंदी, मराठीसह इंग्रजी, राजस्थानी आणि गुजराती फिल्मसाठी कला दिग्दर्शन केले आहे. ‘सप्तपदी’, ‘शहीद भाई कोतवाल’, ‘शुभ निकाह’ आदी चित्रपटासांठी त्यांनी काम केले. भंडारे यांच्या नावावर ऐतिहासिक, सामाजिक आणि विविध चित्रपटांसाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून बारा पुरस्कार आहेत.

देवदास भंडारे यांनी 2022-23 मध्ये अमेरिकेला भेट देत शूटिंगसाठी अनेक ठिकाणांचा अभ्यास केला. हिंदुस्थानातील निर्मात्यांना शूटिंगसाठी कोणते लोकेशन योग्य/ अयोग्य ठरेल यादृष्टीने हा अभ्यास दौरा होता. जे. एस. ड्रीम प्रॉडक्शनचे संजय पटेल यांच्या  ‘द रूम’ या चित्रपटासाठी लोकेशन हंटिंग केले. या दौऱ्यातून बरेच काही शिकता आले, असे भंडारे म्हणाले.