
सामना प्रतिनिधी । नागपूर
मोबाईल फोनवर गेम खेळू न दिल्याने नागपुरात एका 14 वर्षीय विद्याथ्यार्ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. क्रिश लुनावत असे मृत विद्याथ्यार्चे नाव आहे.
क्रिश सातव्या वर्गात शिकत होता. क्रिश नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या महालातील मुंशी गल्लीत पाण्याचे गल्ली जवळ आई व आपल्या 20 वर्षीय मोठय़ा बहिणीसोबत राहत होता. क्रिशची बहिण व आई दोघीही काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. क्रिशला टीव्ही व मोबाईलवर गेम्स खेळण्याचे प्रचंड व्यसन होते. या व्यसनामुळे तो कित्येक दिवस घराबाहेरही पडत नव्हता. आईने मोबाईल न दिल्यामुळे क्रिशने सिलिंग पंख्याला बेडशिटच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी क्रिशची आई मुंबईला जाण्यासाठी निघाली. निघण्यापूर्वी दुपारी तिने क्रिशचा मोबाईल सोबत नेला. संध्याकाळी क्रिशची मोठी बहीण घरी आल्यावर दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा उघडल्यानंतर क्रिश आतमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. क्रिशला टीव्ही व मोबाईल गेम्सचे प्रचंड व्यसन असल्याची माहिती मृत क्रिशच्या बहिणीने पोलिसांना दिली. याप्रकरणी आयशा सुनिल लुनावत हिने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली येथे गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक फुलझेले करीत आहेत.




























































