
सामना ऑनलाईन | मुंबई
नुकत्याच पार पडलेल्या ४५ व्या कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलच्या डायव्हर्सनी घवघवीत यश संपादन केले आहे. अनुज शहा याने मुलांच्या १८ वर्षांखालील गटात १ मीटर स्प्रिंग बोर्ड आणि ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात रौप्यपदक पटकाविले. तसेच मेहेक जैन हिने मुलींच्या १५ वर्षांखालील गटात ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.























































