जेईई मेन्समध्ये ‘आकाश बायजूज’च्या विद्यार्थ्यांचे यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील ‘आकाश बायजूज’ सेंटरमधील 14 विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स 2022 परीक्षेच्या पहिल्या सत्रात 99टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविले आहे. सर्वाधिक गुण मिळवणाऱया विद्यार्थ्यांमध्ये नयन काकडे 99.9343237, रोहन बडगुजर 99.7222745, मयंक झा 99.8858483, अनिश शर्मा 99.6676652, देवांश मिश्रा 99.6473819 आणि स्नेहा बर्मन 99.2463912 यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ‘आकाश बायजूज’चे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी म्हणाले, “आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. जेईई मेन 2022 च्या पहिल्या सत्रासाठी देशभरातून सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यांचे सर्वोच्च पर्सेंटाइल स्कोअर त्यांचे कठोर परिश्रम आणि समर्पण तसेच त्यांच्या पालकांच्या पाठिंब्याचे प्रमाण सांगतो.