
सुदानमध्ये (Sudan) कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामध्ये 23 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 18 हिंदुस्थानी नागरिकांचा देखील समावेश आहे. सुदानची राजधानी खार्टूम (Khartoum) पासून जवळ असणाऱ्या बहरी भागात (Bahri area) येथे ही दुर्घटना घडली. हिंदुस्थानी दुतावासाने ही माहिती दिली आहे.
सुदानमधील बहरी भागात (Bahri area) असणाऱ्या सलूमी (Saloomi) नावाच्या चिनी मातीच्या कारखान्यामध्ये (ceramic factory) गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. ही स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूल असणाऱ्या इमारतीलाही हादरा बसला आणि तडे केले. या दुर्घटनेमध्ये 23 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात 18 हिंदुस्थानी नागरिकांचाही समावेश आहे. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणे देखील अवघड झाले आहे.
दरम्यान, दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती बहरी जिल्ह्याचे पोलीस अधिकारी जनरल हसन अब्दुल्लाह यांनी दिली आहे.
EAM S Jaishankar: Have just received tragic news of a major blast in a ceramic factory “Saloomi” in Bahri area of the capital Khartoum in Sudan. Deeply grieved to learn that some Indian workers have lost their lives while some others have been seriously injured. (file pic) pic.twitter.com/aOvE9pPoUt
— ANI (@ANI) December 4, 2019
























































