गाईच्या हल्ल्यात मुलगा ठार, पोलिसांनी केली गाईला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूडानमध्ये येथे एक वेगळीच घटना समोर आली आहे. एका गाईच्या हल्ल्यात एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अखेर पोलिसांनी त्या हल्लेखोर गाईला अटक केली असून गाईच्या मालकालाही अटक केली आहे.

ही घटना साऊथ सूडानमध्ये घडली आहे. इथे एका फार्मच्या बाजूला एका लहान मुलावर हल्ला केल्यावर मुलाचा जागीच मृत्यू झाला. सूडानमध्ये याआधीही जनावरांना अटक केली आहे. या गाईला पोलिसांनी अटक केली असून तिला तुरुंगात टाकण्यात आले आहे. तिला तीन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

जेव्हा तिची शिक्षा पूर्ण होईल, तेव्हा देशाच्या कायद्यानुसार मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तानुसार, सुदानमध्ये कोणत्याही पाळीव प्राण्याने एखाद्याला मारल्यास, शिक्षा संपल्यानंतर ते जनावर मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून दिले जाते.