ढासला येथील शेतकऱ्याची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बदनापूर

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढासला येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने मागील दोन तीन वर्षापासून शेतीतून अत्यल्प उत्पादन मिळत असल्यामुळे व यंदा तर खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात पावस न पडल्यामुळे जमीन पडित पडल्यामुळे तसेच मुलाच्या नावे असलेले कर्ज कसे फेडणार या विवंचणेत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

बदनापूर तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट झालेली आहे. यंदा तर खरीप व रब्बी असें दोन्ही हंगामातील पिकांपासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळालेले नाही. तालुक्यातील ढासला येथील नाथा काशीनाथ मिसाळ या शेतकऱ्यालाही ढासला येथील गट क्रमांक ४३५ मध्ये अडीच एकर शेती होती. तसेच सदरील मागील दोन तीन वर्षापासून अत्यल्प उत्पादन मिळत असतानाच यंदा तर पावसाअभावी ही शेती पडीत पडून राहिली.

अशातच त्याच्या मुलाच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा गेवराई बाजार येथील कर्जही होते. या शेतकऱ्यांकडे ६० मेंढया होत्या. या मेंढयाचा सांभार या दुष्काळी परिस्थिती कसा करावा या विवंचणेत ते होते. मुलाचे कर्ज कसे फेडावे, मेंढयाचा सांभाळ या दुष्काळी परिस्थितीत कसा करावा, या नैराश्येतून मिसाळ यांनी आपल्या शेतीतील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्म्हत्या केली. ढासला गावकऱ्यांना ही बातमी कळताच त्यांनी मृतदेह काढून पोलिस व महसूल प्रशासनाला कळविले. त्यानुसार बदनापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेनानासाठी मृतदेह आणण्यात आला असून ढासलाचे सरपंच राम पाटील यांनी याबाबत पोलिस व महसूल प्रशासनाला कळवले आहे.