
सामना ऑनलाईन । नगर
लोकसभा निवडणुकीतील भाजपचे संभाव्य उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राळेगणसिद्धी या अण्णांच्या गावी जाऊन त्यांनी पुढील वाटचालीसाठी अण्णांचा आशिर्वाद घेतला.





























































