
उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. या दिवसांत शरीराला गारवा, थंडावा मिळेल असे पदार्थ खावेत. त्यामुळे उष्णतेचे त्रास होत नाहीत. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला गुलकंद उन्हाळ्याच्या दिवसात खाल्ला जातो. वाचा गुलकंद खाण्याचे फायदे.
गुलकंदामुळे पोटाला थंडावा मिळतो, उष्णतेचे अनेक त्रास दूर होतात. यासाठी उन्हाळ्याच्या काळात आपल्या आहारात गुलकंदाचा समावेश करावा.
या दिवसांत शरीरात गर्मी वाढते. हा त्रास असणाऱ्यांसाठी गुलकंद फारच लाभदायक आहे. यामुळे उष्णतेचे अनेक विकार दूर होतात.
नियमित गुलकंद सेवन करण्याने डोकं शांत राहतं. यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ एक चमचा गुलकंद सेवन करा. डोकं शांत राहून सतत राग येणे, चिडचिड होणे या समस्यांपासून सुटका होईल.
उन्हाळा सुरू झाला की, काही वेळा पचनाचे विकारही सुरू होतात. याबरोबरच अॅसिडीटी, डोकं दुखणे, थकवा येणे, पीरियड्सच्या समस्या, जळजळ होणे, उन्हाळे लागणे, थायरॉइडशी संबंधित समस्या सुरू होणे, त्वचाविकार, अनिद्रा अशा विविध प्रकारच्या तक्रारी उद्भवातात. या सर्व प्रकारच्या त्रासांवर गुलकंद गुणकारी आहे.
उन्हाळ्यात घामामुळे दुर्गंध येतो. शरीर थकते. आळस येतो. हे सगळे त्रास दूर व्हावेत यासाठी गुलकंद खा. ताजेतवाने वाटेल आणि उत्साह वाढेल.
नाकातून रक्त येण्याची समस्या बऱ्याच जणांमध्ये असते. अशी समस्या असणाऱ्यांनी दररोज दोन चमचे गुलकंद खा.
गरोदरपणात बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर गुलकंद खाणे फायदेशीर ठरते.
दररोज गुलकंद खाल्ल्याने त्वचा उजळते. रक्त शुद्ध होते. शिवाय मुरुम, नाकावरील ब्लॅकहेडस् निघून जातात.
तोंड येणे, हिरड्या सुजणे यावरही गुलकंद गुणकारी आहे.
गुलकंदामुळे मेंदुचे कार्य जलद गतीने होते. याकरिता दुधासोबत एक चमचा गुलकंद खावे.
कसा खाल ?
शांत झोपेकरिता रात्री दुधातून एक चमचाभर गुलकंद घालून प्या. यामुळे शरीराला थंडावा मिळेल.
गुलकंद पाण्यात मिसळून प्या घोट घोट प्यावा. यामुळे अॅसिडीटी, उन्हाळे लागणे यावर आराम मिळतो.
पचनक्रिया उत्तम राखण्यासाठी एक छोटा चमचा गुलकंद सकाळी आणि जेवणानंतर खा.



























































