
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीला आपल्या कामप्रती किती प्रामाणिक आहे हे आपण पाहिलेच असेल. कामाप्रती सिरियस असणारी सनी वैयक्तीक आयुष्यामध्ये मात्र एकदम मस्तीखोर आहे. कामापासून वेळ मिळाल्यावर मजा-मस्ती करताना तिचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. आताही एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सनीला केक चोरताना रंगेहाथ पकडले आहे.
एका एफएम रेडिओ स्टेशनवर शुटिंग दरम्यान सनीला केक चोरताना रंगेहाथ पकडण्यात आले. पकडल्यानंतर सनी व्हिडीओ काढणाऱ्यालाच झापते. माझ्यासोबत खूप मेहनती लोक असून त्यांच्यासाठी थोडा केक बाजूला ठेवता येत नाही का असेही त्याला विचारते आणि केकचे तुकडे बॅगमध्ये भरून निघते. हा व्हिडीओ सनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
Ummmm yes I have so much fun working!
After all this, my team didn’t even give me a piece of cake! They just took it and ate it! Didn’t even offer me!!
Thanks @RadioMirchi and @mirchiprerna for letting me steal cake! So much fun! pic.twitter.com/IjTh9dhx7G— Sunny Leone (@SunnyLeone) March 25, 2019
सध्या सनी लिओनी वीरमादेवी नावाच्या एका चित्रपटामध्ये भूमिका करत असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटामध्ये सनी एका योद्धा तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता.






























































