
भाजपा आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचे समर्थक भ्रष्टाचाराचे आरोप करत एकमेकांवर धाऊनगेले. ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे गावच्या ग्रामसभेत घडली.
मांडवे गावात सत्ताधारी व विरोधक भाजपा आमदार विखे-पाटील गटाचे आहेत. प्रवरा नदी पात्रातून वाळू उपसा करु नये, असा ठराव झाला असला तरी चोरुन वाळू उपसा केला जातो. तसेच रोकडेश्वर मंदिर व साईबाबा मंदिर जिर्णोध्दरासाठी जमविलेली देणगी, या पैशावरुन विखे-पाटील समर्थकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने दोन्ही गटात तुंबळ खडाजंगी झाली. प्रचंड गोंधळामुळे ग्रामसभा आटोपती घ्यावी लागली.





























































