लष्कर आणि हवाई दलाच्या निष्काळजीपणमुळे निवृत्त जवानाला एचआयव्ही, दीड कोटीची भरपाई देण्याचे निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डय़ुटीवर असताना आजारी पडल्याने रक्त चढवण्यात आले. त्यामुळे आपल्याला एचआयव्हीची लागण झाली, असा आरोप करत हवाई दलाच्या निवृत्त जवानाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने लष्कर आणि हवाई दलाला जबाबदार धरले. तसेच संबंधित जवानाला तब्बल 1 कोटी 54 लाख 73 हजार रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश दिले.

सहा आठवडय़ांच्या आत याचिकाकर्त्याला 1 कोटी 54 लाख 73 हजार रुपये द्यावेत. या प्रकरणात हवाई दलाला लष्कराकडून अर्धी रक्कम घेण्याचा अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. दरम्यान, निव्तृ जवानाने सांगितल्यानुसार 2002 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन पराक्रम’ दरम्यान डय़ुटीवर असताना ते आजारी पडले. त्यांना जम्मू-कश्मीरमधील लष्कराच्या रुग्णालयात रक्त चढवण्यात आले होते. 2014 आणि 2015 मध्ये ते एचआयव्हीबाधित असल्याचे समजले.