सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विमानात आला वाईट अनुभव, ‘डीजीसीए’ला गैरप्रकार करणाऱ्यांसाठी कडक नियमावली करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांना विमानात वाईट अनुभव आला. विमानात दोन प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होते. एक वॉशरूममध्ये झोपला आणि दुसरा बाहेर उलटय़ा करत होता. जवळपास अर्धा तास हा गोंधळ सुरूच होता. महिला कर्मचाऱयांना परिस्थिती हाताळता येत नव्हती. नंतर एका प्रवाशाने दरवाजा उघडला. हा अनुभव भरन्यायालयात सांगतानाच विमानात गैरप्रकार करणाऱयांवर कडक कारवाई करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आदेशही न्यायालयाने ‘डीजीसीए’ अर्थात नागरी विमान वाहतूक संचालनालयाला दिले.

2022 मध्ये एअर इंडियाच्या विमानात झालेल्या लघुशंका कांडाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज पेंद्र सरकार आणि ‘डीजीसीए’ला मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी रचनात्मक पावले उचलण्याची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. केंद्राचे प्रतिनिधित्व करणाऱया सॉलिसीटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, ‘डीजीसीए’ने नवीन परिपत्रक जारी केले आहेत आणि मार्गदर्शक तत्त्वेही अपडेट केली आहेत, परंतु ‘डीजीसीए’च्या नियमांमध्ये काही सुधारणा आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. दरम्यान, शंकर मिश्रा नावाच्या प्रवाशाने 26 नोव्हेंबर 2022 रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणाऱया एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद अवस्थेत एका महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती.  या घटनेनंतर संबंधित वृद्ध महिलेने टाटा समूहाच्या अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर  तब्बल 42 दिवसांनी शंकर मिश्राला अटक करण्यात आली होती.