संकुचित विचार ठेवू नका, पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीची याचिका फेटाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात पाकिस्तानी कलाकारांचा कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. इतका संकुतिच विचार न करण्याचा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

आजच्या या सुनावणीवेळी खंडपीठाने म्हटले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यात आम्हाला स्वारस्य नाही. हा तुमच्यासाठी चांगला धडा आहे, असे नमूद करीत  याचिकाकर्त्याविरोधात केलेले काही निरीक्षणे हटवण्याची याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. 2016 च्या उरी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानी कलाकारांवर 7 वर्षाची बंदी घातली होती. जी आता 2023 ला संपली आहे. ही बंदी कायम राहावी यासाठी याचिकाकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.