पक्ष ओरबाडला तरी पुन्हा नवा पक्ष उभा करेन, सुप्रिया सुळे यांचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वस्तू नसून शरद पवार यांचा विचार आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे गेले नसून हिसकावून घेतले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या आणि देशातल्या असंख्य लोकांनी ज्यांनी आदरणीय पवार साहेबांवर प्रेम दाखवलं, निष्ठा दाखवली, साथ दिली. त्यांच्या समोर मी नतमस्तक होऊन त्यांच्या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी इतके वर्ष पवार साहेबांना साथ दिली असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, प्रेमाच्या नात्यात व्यवहार आणि हिशेब नसतो. त्यामुळे प्रेमाचं नात खूप कमी लोकांना समजतं. प्रेमाची नाती जपायची असतात. नाती जपायला जास्त ताकद लागते, तोडायला फार हिंमत लागत नाही. कुणी पक्ष सोडून गेल्याने काही फरक पडत नाही असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आठ वर्षांपूर्वी आम्ही निवडणूक रोख्यांना विरोध केला होता. मात्र भाजपाने आमच्यावर तेव्हा भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला. मी आज सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार मानते. न्यायालयाने निवडणूक रोख्यांवर बंदी घातली आहे. आज सर्वांत जास्त निवडणूक रोखे हे भाजपाकडे आहेत. निवडणूक रोख्यांचा विषय फार महत्त्वाचा आहे. या निवडणूक रोख्यांचा तपास झाला पाहिजे. कारण सर्वोच्च न्यायालयच म्हणत आहे की, यात भ्रष्टाचार झालेला असू शकतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दुसरा सर्वांत मोठा विषय हा पेटीएमचा आहे. देशातला सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हे मी नव्हे केंद्र सरकारच म्हणत आहे. नोटबंदी करण्यात आली. सगळ्या नोटा गेल्या असा दावा केला जातो. मग तुम्ही धाड टाकता तेव्हा हे पैसे कोठून येतात. देशातील पैसे कोणीतरी वेगळंच छापत आहे का? डिजिटल पेमेंट आणण्यात आलं. यामुळे कोणीही भ्रष्टाचार करू शकणार नाही, असा दावा करण्यात आला. मात्र सर्वांत मोठा भ्रष्टाचार हा पेटीएममध्ये झाला आहे. हा भ्रष्टाचार 27 हजार कोटी रुपयांचा आहे. हे माझं मत नाहीये. मी या बातम्या वर्तमानपत्रांत वाचल्या आहेत. याच पेटीएममध्ये चीनकडून गुंतवणूक करण्यात आली,” असा दवा सुप्रिया सुळेंनी केला.

सुप्रियासुळे म्हणाल्या की, 10 वर्षांपूर्वी कोणालाही ईडी माहिती नव्हती. आता गावागावात ईडी काय आहे, हे समजले आहे. आज शेंबडं पोर पण म्हणतं की माझ्याशी भांडू नको नाहीतर तुझ्यामागे ईडी लावेल. मला ग्रामीण भागात विचारतात की ताई त्यांनी ईडीमुळे पक्ष बदलला का? पण मला त्यात पडायचेच नाही असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.