… पण पैशाचं सोंग आणता येत नाही, देशावरील वाढत्या कर्जावरून सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारला फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या डोक्यावरील कर्जाचा बोझा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 2014 ला मोदी सरकार सत्तेत येण्याआधी 55 लाख कोटींचे कर्ज देशावर होते. गेल्या नऊ वर्षात ते तिपटीहून अधिक म्हणजे 173 कोटींवर गेले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला फटाकरले आहे. तसेच सरकारने त्यासाठी जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

”सोंग कशाचंही आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणतात. आर्थिक परिस्थितीचं कोंबडं कितीही डालून ठेवलं तरीही ते आरवल्याशिवाय राहत नाही. भारताच्या आर्थिक स्थितीची हिच अवस्था आहे. सन 2014 साली 55 लाख कोटी रुपयांचं कर्ज भारताच्या डोक्यावर होतं मात्र 2023 संपता संपता हा आकडा दुपटीपेक्षा जास्त होऊन 173 लाख कोटी इतका झाला. भाजपाने 2014 साली देशावरील कर्ज हा निवडणूकीचा मुद्दा बनविला होता. हे कर्ज सारुन अच्छे दिन आणू हा वायदा त्यांनी केला होता. आता भाजपाने या 173 लाख कोटी रुपयांच्या कर्जाबाबत खुलासा करावा. यासोबतच देशाला दिलेले वचन पुर्ण करु शकलो नसल्याची कबुली देऊन माफी मागावी”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.