सुरेखा रांजणकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गीता तथा सुरेखा रांजणकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे वय 65 वर्षे होते. रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष भारत रांजणकर व दैनिक ‘सामना’चे मुरुड येथील वार्ताहर संतोष रांजणकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे उत्तरकार्य मंगळवारी 2 जानेवारी व बारावे, तेरावे शुक्रवारी 5 जानेवारी रोजी मुरुड-एकदरा येथे होणार आहे.