
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना वापरण्यासाठीच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात झालेल्या 3600 कोटींच्या घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतून संरक्षण दलाल सुशेन गुप्ता याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली.
ईडीच्या पथकाने सुशेन गुप्ता याला मनी लाँड्रिंग कायद्याखाली अटक केली आहे. गुप्ता हा संरक्षण दलाल असून ऑगस्टा वेस्टलँज हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात त्याचा हात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात पुढील कारवाईसाठी हजर केले जाणार आहे. वकील गौतम खेतान आणि कथित ब्रिटिश मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल या दोघांनी ईडीने यापूर्वी अटक केली आहे. सुशेन गुप्ता याच्याकडे हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील पैशांची माहिती असावी, असा कयास आहे. त्यामुळे त्याला जेरंबद केले आहे.
हिंदुस्थानने ऑगस्ट वेस्टलँडची ब्रिटिश उपकंपनी फिनमेक्कानिकाशी केलेला 12 हेलिकॉप्टर खरेदीचा करार 1 जानेवारी 2014 रोजी रद्द केला होता. सदर व्यवहारासाठी कंपनीने मध्यस्थांना 423 कोटी दलाली दिल्याचा आरोप आहे.
























































