सुषमा स्वराज यांनी थोपटली गडकरींची पाठ! पाहा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सध्या लोकसभा निवडणुकांमुळे सर्वत्र रणधुमाळी माजली आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली येथील कार्यालयात सोमवारी मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकांसाठी आयोजित असलेल्या बैठकीवेळी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी नितिन गडकरी यांची पाठ थोपटली आहे.

या प्रसंगाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. सोमवारी पक्ष मुख्यालयाबाहेर सुषमा स्वराज दाखल झाल्या. त्यांच्या पाठोपाठ गडकरीही तिथे पोहोचले. सुषमा यांना पाहताच गडकरी यांनी त्यांना मान झुकवून नमस्कार केला. त्यावेळी स्वराज यांनी त्यांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवत त्यांची पाठ थोपटली. सुषमा स्वराज या गडकरी यांच्यापेक्षा सहा वर्षांनी ज्येष्ठ आहेत. नितिन गडकरी यांनीही हा व्हिडीओ शेअर करत तुमच्या आशीर्वादासाठी धन्यवाद अशी कॅप्शन दिली आहे.