
सामना ऑनलाईन । मुंबई
मिस युनिव्हर्सचा किताब जिंकलेली अभिनेत्री सुष्मिता सेन हिने अद्याप लग्न का केलेले नाही असा प्रश्न तिच्या चाहत्यांना कायम पडतो. लग्नाच्या बाबतीत कायम मौन बाळगणाऱ्या सुष्मिताने चक्क विवाहसंस्थेवर टीका केली आहे. तिच्या या पोस्टवरून नेटकऱ्यांनी सुष्मिताला ट्रोल केले आहे.
‘ज्यानी कुणी विवाह संस्था सुरू केली ते नरकासारखे वाईट आहेत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तू मला सोडून जाऊ नको म्हणून मी सरकारला आपल्यामध्ये आणणर’ असे ट्वीट सुष्मिता सेनने केले आहे. या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया आल्या असून त्यात अनेकांनी सुष्मिताला ट्रोल केले आहे. सुष्मिताचे लग्न झालेले नसल्याने तिला विवाह संस्थेचा अनुभव नाही. त्यामुळे ती अशी पोस्ट शेअर करतेय अशी टीका काहींनी केली आहे. तर वय वाढल्यानंतर लग्न न झालेल्यांना अशा प्रकारचे नकारात्मक विचार येतात असंही काहींनी तिला सुनावलं आहे.































































