
हिंदुस्थानचा मराठमोळा जलतरणपटू सुयश जाधवने शुक्रवारी टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतील 200 मीटर वैयक्तिक मेडले एसएम-7 स्पर्धेतून माघार घेतली आहे. आजारी पडल्याने त्याला नाइलाजाने हा निर्णय घ्यावा लागला.
हिंदुस्थानी पथकाचे मिशनप्रमुख गुरशरण सिंग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, हवामान बदलामुळे सुयश जाधवला सर्दी झाली असून त्याचा घसाही खराब झाला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला शुक्रवारी स्पर्धेत सहभागी न होता विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आम्ही सुयश जाधवला शुक्रवारी स्पर्धेत न खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र इतर दोन स्पर्धांत हा जलतरणपटू नक्कीच पदक मिळविण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल, असा विश्वासही गुरशरण सिंग यांनी व्यक्त केला.
कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने 27 वर्षीय सुयश जाधवला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची उद्या (दि. 27) होणारी 200 मीटर वैयक्तिक मेडले एसएम 7 स्पर्धा हुकणार असली तरी 1 सप्टेंबरला 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक एस-7 व 3 सप्टेंबरला 50 मीटर बटरफ्लाय एस-7 स्पर्धेत तो पदकासाठी काwशल्य पणाला लावणार आहे.



























































