कालीनंतर आता शिवशंकरांच्या पोस्टरवरून वाद, हिंदू संघटनांच्या विरोधानंतर हटवले बॅनर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काली या माहितीपटाच्या पोस्टरवरून देशभरात सुरू झालेला वाद थांबण्याची चिन्हं नाहीत. याच दरम्यान, भगवान शिवशंकरांच्या पोस्टरवरून नवीन वाद उद्भवला आहे.

ही घटना तामिळनाडू येथील कन्याकुमारी इथे हा प्रकार घडला आहे. येथील थिंगल नगर परिसरातील आरोग्यपुरम येथे एका जोडप्याचं काही दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी नवऱ्याच्या मित्रांनी 2 बॅनर लावले.

यातील एका पोस्टरवर शिवशंकरांना सिगरेट पेटवताना दाखवण्यात आलं. त्या खाली नवऱ्यामुलाला गमतीशीर संदेश देण्यासाठी काही ओळी लिहिल्या. आपले केस छोटे ठेव. इतके की बायकोच्या हातात सापडू नयेत, असं त्यांनी लिहिलं. त्या बॅनरवरून हिंदू संघटना संतापल्या.

त्यांनी या पोस्टरवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. त्यांनी हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलं. त्यानंतर पोलिसात तक्रार देखील दाखल करण्यात आली. पोलिसांनी नवऱ्या मुलासह त्याच्या मित्रांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं आणि त्यांना सावधानतेचा इशारा देऊन सोडण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी ते बॅनर देखील हटवून टाकलं.