
सामना प्रतिनिधी । मुंबई
अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप करणार्यां तनुश्री दत्ताने आता पोलिसांच्या बी समरी रिपोर्ट विरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. नानाच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी कोणतेही पुरावे मिळाले नसल्याने पोलिसांनी बी समरी रिपोर्ट दाखल केला आहे. बी समरी म्हणजे फिर्यादीत तथ्य नसून प्रकरण बंद करणे. तनुश्रीच्या वतीने ऍड. नितीन सातपुते यांनी अंधेरी न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला. पुढील सुनावणी 7 सप्टेंबर रोजी होईल. 2008 साली हॉर्न ओके प्लीज सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नानाने गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता.































































