बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार; लहान मुलांमधील कोरोना कसा रोखावा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टरांशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे  रविवार 23 मे रोजी दुपारी 12 वाजता राज्यातील बालरोग तज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून  डॉ. सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदारकर हे फोर्सचे सदस्य आहेत.

यापूर्वी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील फॅमिली डॉक्टरांशी संवाद साधला होता. 

हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra आणि युटय़ूब Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9E²D4hQ  येथे थेट पाहता येणार आहे.