
टाटा पॉवरने उपनगरातील आपल्या वीज ग्राहकांचा वीजदर कमी करण्यासाठी केंद्रीय अपिलीय प्राधिकरणाकडे धाव घेतली आहे. बहुवार्षिक वीजदर निश्चित करताना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने 2024-25 साठी टाटा पॉवरला अवाच्या सवा वीजदर वाढ मंजूर केली आहे. सदरचा दर आपल्या मागणीएवढा कमी करावा यासाठी टाटा पॉवरने केंद्रीय वीज अपिलीय प्राधिकरणाकडे धाव घेत याचिका दाखल केली आहे.
टाटा पॉवरने बहुवार्षिक वीज दर निश्चितीची याचिका दाखल करताना आपल्या उपनगरातील वीज ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसू नये म्हणून 2024-25 या वर्षासाठी कमी वीजदर वाढीची मागणी केली होती. मात्र वीज आयोगाने त्यांना मोठय़ा प्रमाणात वीज दरवाढ दिल्याने टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना पुढील वर्षी मोठा आर्थिक झटका बसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर टाटा पॉवरने वीज आयोगाच्या आदेशाला आव्हान देत आपण केलेल्या मागणीच्या प्रमाणात वीजदर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे अपिलीय प्राधिकरण काय निर्णय घेणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
वीज वापर टाटाने मागणी आयोगाने मंजूर
(युनिटमध्ये) केलेला दर केलेला दर
0-100 2.24 रुपये 6.53 रुपये
101-300 4.96 रुपये 9.03 रुपये
301-500 7.80 रुपये 12.23 रुपये
500 पेक्षा जास्त 8.52 रुपये 12.83 रुपये


























































