Tata Nano येत आहे नव्या इलेक्ट्रिक अवतारात? जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बजेट फ्रेंडली कार अशी ओळख असणारी टाटाची नॅनो आता लवकरच हिंदुस्थानांत लाँच होणार आहे. टाटा मोटर्स नॅनोचा इलेक्ट्रिक अवतार बाजारात आणणार की नाही यावर बऱ्याच दिवसांपासून सस्पेंस आहे. मात्र येत्या काही दिवसातच टाटा आपली सर्वात लहान आकाराची इलेक्ट्रिक कार हिंदुस्थानात लाँच करू शकते. ही कार सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये लाँच केली जाणार असून नॅनोच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यात आला आहे. नवीन नॅनो मध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन, आधुनिक सस्पेंशन याव्यतिरिक्त रुंद टायरचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, नॅनोच्या लाँचबद्दल टाटा मोटर्सकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.

Tata Motors येत्या 5 वर्षात भारतात 10 नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. यामध्ये टाटा नॅनो इलेक्ट्रिकचा देखील समावेश असणार आहे. इलेक्ट्रिक अवतारात येणाऱ्या टाटा नॅनोच्या केबिनमध्ये कंपनी स्टँडर्ड मॉडेलपेक्षा जास्त लेगरूम दिला जाऊ शकतो. नॅनोचा व्हीलबेस देखील वाढवला जाऊ शकतो. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक गाड्यांना सध्या मोठी मागणी आहे. नेक्सॉन ईव्ही, टिगोर ईव्ही आणि नुकत्याच लाँच झालेल्या कंपनीच्या सर्वात स्वस्त टियागो ईव्हीला सध्या जास्त मागणी आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान, कंपनीने हिंदुस्थानात एकूण 24 हजारहून अधिक इलेक्ट्रिक कार विकल्या आहेत. त्यामुळे आता टाटा नॅनो इव्ही बाजारात येण्याची प्रतीक्षा ग्राहकांना आहे.