कर अधिकारी जेरबंद, 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

येथील वस्तू व सेवाकर कार्यालयात कार्यरत असलेले राज्यकर अधिकारी वर्ग -२ प्रदीप सदाशिव देशमुख यांना दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वस्तू व सेवाकर कार्यालयातच रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.जालना येथे मंठा बायपासजवळ सफारी नावाचे बिअरबार व रेस्टॉरंट असून, बारा वर्षांपासून हे हॉटेल चालू आहे. त्याचा नियमानुसार (व्हीएटी) भरत आहेत. २५ ऑक्टोबर रोजी राज्य कर अधिकारी प्रदीप देशमुख यांनी हॉटेलचे जालना मर्चंट को-ऑप बँकेमध्ये असलेले खाते आणि एचडीएफसी बँक खाते पत्र देऊन सील केले होते. राज्य कर अधिकारी  प्रदीप देशमुख यांनी पत्र दिल्याने संबधित बँकेनी खाते सील केल्याचे हॉटेल मालकाला कळविले होते. दोन्ही खाते टॅक्स भरला नसल्यामुळे सील केल्याचे सांगण्यात आले होते.

हॉटेल सफारीचे मालक यांनी टॅक्स भरून १४ नोव्हेंबर २०१८ रोजी टॅक्सच्या सर्व पावत्या सीएमार्पâत राज्य कर अधिकारी प्रदीप देशमुख यांना दाखवल्या होत्या. तेव्हा प्रदीप देशमुख यांनी सीएला सांगितले की, टॅक्स उशिरा भरला असून, टॅक्स उशिरा भरल्यामुळे मोठा दंड आकारण्याचा मला अधिकार आहे. मला १५ हजार रुपये दिले तर सील केलेले खाते रिलीज करण्याचे पत्र बँकेला देईल असे सांगितले. संबंधित सीएने हा निरोप हॉटेलमालकाला दिला. तक्रारदार हॉटेलमालकाने कर अधिकाNयांना फोन करून या विषयी विचारणा केली असता प्रत्यक्ष भेटण्यास बोलावले.  तक्रारदारला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. लाचलुचपत विभागाने १९ नोव्हेंबर रोजी राज्य कर कार्यालयात जाऊन १० हजार रुपये लाच मागितल्याची खात्री केली. त्यावरून लाचलुचपत विभागाने मंगळवार, २० रोजी वस्तू व सेवा कर कार्यालयात सापळा लावला. त्यावेळी राज्य कर अधिकारी प्रदीप देशमुख यास पंचासमक्ष १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक आदिनाथ काशिद, अशोक टेहर, संतोष धायडे, प्रदीप दोण्डे, संदीप लव्हारे, संजय उदगीरकर, महेंद्र सोनवणे, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर, चालक प्रवीण खंदारे यांनी पार पाडली.