
हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर गेला असून आता संपूर्ण संघ 14 दिवसांच्या विलगीकरणात आहे. मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर शनिवारी सर्व क्रिकेटपटूंनी आऊटडोअर सरावाला सुरुवात केली. याप्रसंगी बीसीसीआयने सोशल साइटवर टीम इंडियाचे क्रिकेटपटू सराव करतानाचे फोटो पोस्ट केले.
हार्दिक पांडय़ा, पृथ्वी शॉ व मोहम्मद सिराज यांनी सिडनी ऑलिम्पिक पार्पमध्ये सराव केला. तसेच कुलदीप यादव, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, चेतेश्वर पुजारा, रवींद्र जाडेजा यांनीही वार्म अप केले.
टी. नटराजन व दीपक चाहर या गोलंदाजांनीही जिममध्ये फिटनेससाठी मेहनत घेतली. टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी जिममध्ये तर काही खेळाडूंनी आऊटडोअर सराव करीत आपण ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कडवी झुंज देणार आहोत याची प्रचीती दिली.
कोहली, बुमराह टुअर सामन्यात खेळणार नाही
हिंदुस्थानी क्रिकेट संघाला कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियामध्ये दोन टुअर अर्थातच सराव सामने खेळावयाचे आहेत.
6 ते 8 डिसेंबर या कालावधीत पहिला तर 11 ते 13 डिसेंबर या कालावधीत दुसरा सराव सामना खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सराव सामन्यात विराट कोहली व जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.






























































