बंगळुरूतून आलेल्या विमानात तांत्रिक बिघाड, 178 साईभक्त अडकले शिर्डी विमानतळावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
indigo
फाईल फोटो

वैमानिकाच्या डाव्या बाजूला असलेली काच तडकल्याने बंगळुरू येथून शिर्डीला आलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. त्यामुळे बंगळुरू येथील 178 भाविक शिर्डी विमानतळावरच अडकून पडले होते. या प्रवाशांना दुसऱया विमानाने बंगळुरूला पाठविण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे.

वैमानिकाच्या आसनाच्या डाव्या बाजूला असलेली काच तडकल्याने बंगळुरू येथून शिर्डीला आलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचे परतीचे उड्डाण रद्द करण्यात आले. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. या विमानात सुमारे 178 प्रवासी असल्याचे सांगण्यात आले. परतीचे उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. कंपनीने त्यांची निवास व भोजनव्यवस्था केली. तडा गेलेला भाग बदलण्यासाठी दिल्ली येथून तंत्रज्ञांचे एक पथक आणि हा नवा सुटा भाग मागविण्यात येणार आहे. 15 ते 20 मिनिटांत तो नवा भाग बसविला जाईल. मंगळवारी सकाळी 11च्या सुमारास हे विमान उड्डाण करण्यासाठी पुन्हा तयार होणार असल्याचे साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक सुशील श्रीवास्तव यांनी सांगितले.