
सामना ऑनलाईन । पाटणा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेज प्रताप आणि त्याचा लहान भाऊ तेजस्वी यांच्यात विस्तव जात असल्याचे लोकसभा निवडणूकीच्या वेळी सर्वांनीच पाहिले. यावरून त्यांच्यावर टीका होत असतानाच तेज प्रताप यादव याने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तेज प्रताप यादव याने त्यांच्याविषयी बोलणाऱ्यांना आम्ही चिरून टाकू अशी धमकीच दिली आहे.
‘आम्हा भावंडाच्या जोडीवर अनेक प्रश्न विचारले गेले. सतत टीका झाली. आमच्या दोघांच्या मध्ये जो येणार त्याच्यावर चक्र चालवलं जाईल. आमच्या बद्दल जो बोलेल त्याला आम्ही चिरून टाकू’, अशी धमकीच तेज प्रतापने दिली आहे. तेज प्रताप




























































