
सामना ऑनलाईन । हैदराबाद
तेलंगणामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर 25 लाखांची ऑफर दिल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. तर काँग्रेसचा भांडाफोड झाल्याने त्यांची पंचाईत झाली आहे.
ओवैसींनी एका प्रचारसभे दरम्यान बोलताना आरोप केला आहे की, ‘काँगसने निर्मल येथे प्रचारसभा रद्द करण्यासाठी 25 लाखाची ऑफर दिली होती, पण विकला जाईल असा व्यक्ती नाही.’
ओवैसींच्या आरोपांनतर काँग्रेसने या आरोपांचे खंडन केले आहे. काँग्रेसचे नेते मीम अफजल यांनी ओवैसी आणि भाजप एकाच शिक्क्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले आहे. ओवैसी भाजपची मदत करू इच्छितात. तसेच आपल्या सभेची चर्चा व्हावी म्हणूनच ओवैसी असे आरोप करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.






















































