थर्टी फस्टच्या पार्टीत विचारले नाही, जावयाने दोन मुलांसह केली 6 जणांची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। बँकाँक

थर्टी फस्टच्या पार्टीत सासरच्यांनी विचारले नाही यामुळे अपमानित झालेल्या जावयाने स्वत:च्या दोन मुलांसह सासरकडील 6 जणांची गोळ्या घालून हत्या केल्याची भयंकर घटना थायलँडमध्ये घडली .सुशीप र्सोसंग असे आरोपीचे नाव आहे.

थर्टी फस्ट असल्याने सुशीपच्या सासरच्यांनी त्याला पार्टीसाठी कुटुंबासह घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. यामुळे सुशीप पत्नी व आपल्या नऊ आणि सहा वर्षांच्या मुलांना घेऊन सासरी गेला. पण तिथे गेल्यावर आपल्याशी बोलण्यास कोणीही उत्सुक नसल्याचे व आपल्याला टाळत असल्याचे त्याच्या लक्षात आले. यामुळे त्याने भरपूर मद्यपान केले व त्यानंतर जवळील बंदूकीतून घरच्यांवर गोळीबार केला. यात त्याची दोन मुलं व सासरकडील सहा व्यक्तींचा गोळी लागल्याने जागीच मृत्यु झाला. नववर्षाला काही सेकंद उरलेला असतानाच सुशीपने हे हत्याकांड घडवून आणल्याने थायलँडमध्ये खळबळ उडाली आहे.