शासन आपल्या दारी, भ्रष्टाचाराच्या फाईल गायब करी! ठाणे महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाणे पालिकेतून अनधिकृत बांधकामांचा अहवाल असलेली फाईल चोरीला गेल्यामुळे प्रशासनाच्या कारभाराचे आता वाभाडे निघू लागले आहेत. शासन आपल्या दारी… भ्रष्टाचाराची फाईल गायब करी, अशी टीका सोशल मीडियातून होऊ लागली आहे. ही फाईल चोरीला गेल्याचा प्रकार दैनिक ‘सामना’ने उघडकीस आणल्यानंतर अधिकाऱयांची पळापळ उडाली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांना माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील बेकायदा बांधकामे वाचवण्यासाठी भूमाफिया आणि त्यांच्या पाठीराख्या अधिकाऱयांनी हा कारनामा केला असल्याची टीका ट्विटरद्वारे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

अधिकाऱयांना मिळालेल्या पैशांमुळे ही फाईल चोरीला गेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याची ही अवस्था असेल तर राज्याचा विचार न केलेललाच बरे. – केदार दिघे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख

ठाणे महापालिकेत फाईल गायब होणे यात नवीन काहीच नाही. भ्रष्टाचाऱयांना पाठीशी घालण्यासाठी हे सर्व घडणारच होते. – जितेंद्र आव्हाड, आमदार – राष्ट्रवादी काँग्रेस