
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो ठाणे) आणि जितो एज्युकेशनल अँड मेडिकल ट्रस्ट येत्या 20 मार्च रोजी आयोजित होणाऱया टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनच्या पहिल्या आवृत्तीच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहेत. टोरेंट जितो ठाणे हाफ मॅरेथॉनचे आयोजन ठाणे महानगरपालिका, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि श्रीमहावीर जैन हॉस्पिटल यांच्या समन्वयाने केले जाणार आहे.
हाफ मॅरेथॉनचा लोगो आणि रेस डे जर्सीचे अधिकृत उद्घाटन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. या हाफ मॅरेथॉनचे प्रमुख उद्दिष्ट कर्करोगाप्रति जागरूकता निर्माण करण्याचे असून या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना ‘रन फॉर कॅन्सर’ ही आहे. असे जितो ठाणे चॅप्टरचे अध्यक्ष. महेंद्र जैन यांनी सांगितले.
या उपक्रमातून क्रीडाप्रेमी, व्यावसायिक धावपटू, सुरुवात करणारे आणि सर्व ठिकाणच्या लोकांना एकत्र आणले जाईल. देशभरातील हजारो धावपटू आणि प्रेक्षक या रेसमध्ये सहभागी होतील आणि या उपक्रमाला ठाणे जिह्यातील सर्वांत मोठय़ा धावण्याच्या उपक्रमांपैकी एक बनवतील.या उपक्रमात तीन प्रस्थापित वर्गवारी असतील- हाफ मॅरेथॉन (21 किमी), 10 किमी रेस आणि 5 किमी रनफन हौशी तसेच कुटुंबे आणि मुलांसाठी असतील. ही रेस सर्व वयोगटातील, लिंगाच्या आणि क्रीडा क्षमता असलेल्यांसाठी खुली असेल. या रेसला रेमंड ग्राऊंड, ठाणे येथून सुरूवात होईल. हाफ मॅरेथॉन (21 किमी) आणि 10 किमी या वेळेवर आधारित स्पर्धा असतील. 20 मार्च 2022 रोजीवयाची 18 वर्षे पूर्ण झालेले सहभागी (हाफ मॅरेथॉन), 16 वर्षे वयाच्या (10 किमी) आणि 12 वर्षे वयाच्या(5 किमी) खेळाडूंना यात सहभाग घेता येईल. विजेत्यांना एकूण 18 लाख रूपयांची पारितोषिके दिली जातील. ती विविध वर्गवारींमध्ये वितरित करण्यात येतील.


























































