
सामना ऑनलाईन । मुंबई
हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारीत ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच वाद निर्माण झाले आहेत. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता असतानाच या चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवरून गायब झाल्याचा आरोप अभिनेते अनुपम खेर यांनी केला आहे. देशातील काही भागात हा व्हिडीओ तर दिसत नसल्याचे समोर आले आहे. चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम खेर यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली.
Dear @YouTube!!! I am getting messages & calls that in parts of our country if you type, trailer of #TheAccidentalPrimeMinister, it is either not appearing or at 50th position. We were trending at No.1 yday. Please help. #HappyNewYear. #37millionviews https://t.co/TUu4AtaRzk pic.twitter.com/KhoZJuxmmu
— Anupam Kher (@AnupamPKher) January 1, 2019
‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर देशातील काही भागात दिसत नसल्याचे मला काही जणांनी मेसेज आणि कॉल करून कळविले आहे. काही जणांना हा ट्रेलर युट्युबवर शोधल्यानंतर पन्नासाव्या स्थानावर असल्याचे दिसून आले. आम्ही काल पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होतो’, असे अनुपम खेर यांनी ट्वीट केले आहे. दरम्यान नेटकऱ्यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरले असून काँग्रेस डर्टी पॉलिटिक्स खेळत असल्याचे देखील आरोप होत आहेत.
अनुपम खेर यांचा ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट मनमोहन सिंग यांचे खासगी सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. अनुपम खेर यांच्याखेरीज चित्रपटात अक्षय खन्ना, सुझॅन बर्नेट, आहाना कुमरा, अर्जुन माथूर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये असणार आहेत. हा चित्रपट 11 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.
Is it something that Congress playing dirty politics and Paying @YouTube for Hiding trailer of #TheAccidentalPrimeMinister ? If true, Shocking.
— Sueing Machine (@SueingMachine) January 1, 2019
Why @YouTubeIndia not showing the accidental prime minister trailer in recent searches. #YoutubeHidingTAPM pic.twitter.com/KuPamwFQJt
— Ranjeet Yadav (@RkRy44) January 1, 2019
True @YouTube is not show the trailer for the movie Accidental Prime Minister.. from next day after trailer release it’s hidden. Even after scrolling down for long the movie trailer is not there on the YouTube channel pic.twitter.com/s9fdZVia9y
— Patishapta (@patishapta) January 1, 2019

























































