नोटांवर गांधीजी कायम राहणार; आरबीआयचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात चलनात असलेल्या नोटांवर महात्मा गांधी यांची प्रतिमा (वॉटरमार्क) कायम राहणार आहे. ती बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असा खुलासा केंद्रीय बँक आरबीआयने सोमवारी केला.

चलनी नोटांवर असलेली महात्मा गांधी यांची प्रतिमा बदलली जाणार असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू होती. रिझर्व्ह बँकेने या संदर्भात ट्विट केले आहे. “प्रसारमाध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सध्याच्या चलनात आणि बँक नोटांमध्ये महात्मा गांधी यांची प्रतिमा बदलून त्या जागी इतरांची प्रतिमा वापरण्याचा विचार सुरू आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, याची नोंद घ्यावी,” असे टि्वट करून रिझर्व्ह बँकेने माहिती दिली.

चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याऐवजी कवी रवींद्रनाथ टागोर आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची प्रतिमा छापली जाणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियात सुरू होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.