
महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पाडून महाराष्ट्रात बंडखोरी करून सत्तेत आलेले मिंधे सरकार घटनाबाह्य असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यपालांनी निमंत्रण दिलेले नसतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेतली. राजभवनकडून माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीतूनच याबाबतचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या कागदपत्रांची मागणी नवी मुंबईतील रहिवाशी असणारे संतोष जाधव यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये राजभकनकडे केली होती. शिंदे, फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी दिलेल्या पत्राचा जावक क्रमांक आणि संबंधित जावक नोंदवहीची छायांकित प्रमाणित प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी माहितीच्या अधिकारात केली होती; मात्र राज्यपालांच्या सचिवालयाच्या जावक नोंदीमध्ये असा कोणताच तपशील उपलब्ध नसल्याचे राजभवन येथील जन माहिती अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शपथ असंविधानिक – राष्ट्रवादी
शिंदे आणि फडणकीस यांना सरकार स्थापन करण्यासाठी कोणतेही पत्र अथका निमंत्रण देण्यात आले नक्हते, अशी पुष्टीच माहिती अधिकारात राजभकनकडून दिलेल्या माहितीतून समोर आली आहे. त्यामुळे ही शपथच असंकिधानिक असल्याचा आरोप राष्ट्रकादीचे राज्य मुख्य प्रकक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
फडणवीसांकडून सारवासारव
दरम्यान, या प्रकरणाकर उपमुख्यमंत्री फडणकीस यांनी सारवासारव करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. सरकार स्थापनेसंदर्भातील कागदपत्रे ही सर्केच्च न्यायालयात केस सुरू असल्याने राज्यपालांच्या जकळ आहेत. राज्यपालांच्या ऑफिस जकळ नाहीत याचा अर्थ कागदपत्रे नाहीत असा होत नाही. सरकार स्थापन झाले त्यावेळी राज्यपालांनी लेखी पत्र दिले असल्याचे म्हटले आहे.
माहितीची लपवाछपवी
राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना शपथविधीसाठी दिलेल्या निमंत्रणाची माहिती अपेक्षित असताना शपथविधी समारंभासंदर्भात शासनासोबत केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती राज्यपाल कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अर्जदारास हीच माहिती अपेक्षित असल्याचे आहे असे समजून माहिती अधिकारात केलेला अर्ज निकाली काढत सरकार स्थापनेसंदर्भातील माहितीची लपवाछपवी केली जात असल्याचे दिसून येत आहे.























































