चोरट्यांनी सिग्नलच्या वायर चोरल्याने हार्बर सेवा विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चोरट्यांनी केबलच्या वायर चोरण्यासाठी लोकेशन बॉक्स तोडल्याने मध्य रेल्वेची हार्बर सेवा विस्कळीत झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. पनवेल येथील लोकेशन बॉक्स आदल्या रात्री चोरट्यांनी तोडल्याने पहाटे लोकल सेवा सुरू करताना तांत्रिक बिघाडाचा फटका लोकल सेवेला बसला. सकाळी सात वाजल्यानंतर हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. तरी उशिरापर्यंत हार्बर सेवा विस्कळीत झाली.

पनवेल येथे लोकेशन बॉक्समध्ये काल रात्री चोरट्यांनी केबल कापल्याने पहाटे हार्बरची लोकल सेवा रखडली. त्यामुळे येथील सिग्नल सेवा मॅन्युअली चालविण्यात आल्याने लोकल उशीराने धावत होत्या. यामुळे 40 लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या. तर 82 लोकल उशीराने धावल्याने प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा. सकाळी 7.05 वाजता हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. त्यानंतरही लोकल सेवेवर याचा परिणाम जाणवला. या प्रकरणी आरपीएफने अज्ञात व्यक्तीविरोधात ‘एफआयआर’ दाखल केला आहे.