अमरावतीत दोन दिवसांत उष्माघाताने तिघांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भ मागील आठवड्यापासून खूपच तापला आहे. अकोला, चंद्रपूर, नागपूरसह अमरावती जिह्यातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अमरावती जिह्यात सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे तापमान 45 ते 47 अंशांच्या पुढे पोहोचले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेमुळे गेल्या दोन दिवसांत उष्माघाताचे तिघांचा मृत्यू झाला. संपूर्ण जिह्यात दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदी आहे.