
नगर जिल्ह्यामध्ये आता पोलीस प्रशासनाने धडक कारवाई म्हणून माहिती घेतली असताना गावठी कट्टे बाळगणारे 3 सराईत आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला यश आले आहे.
लखन भाऊसाहेब आल्हाट (वय 32 वर्षे, रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. नगर), लखन उर्फ लक्ष्मण सुधाकर सरोदे (रा. मोरया, चिंचोरे, ता. नेवासा, जि. नगर), अविनाश उर्फ देविदास उर्फ आबा विक्रम उर्फ विक्रांत आल्हाट रा. मोरया चिंचोरे, ता. नेवासा, जि. नगर आरोपींची नावे आहेत
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोनि दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत लखन भाऊसाहेब आल्हाट रा. नेवासा हा त्याचे साथीदारासह विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा (अग्निशस्त्र) आपले कब्जात बाळगुन ते विक्री करण्याचे उद्देशाने भिस्तबाग महालासमोर, सावेडी परिसरामध्ये येणार असल्याची बातमी मिळाल्याने सदर बातमीची हकीगत वरील पोलीस पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत पथकास आदेश दिले.
पथकाने लागलीच दिनांक 12 रोजी पंचासह भिस्तबाग महाल, सावेडी परिसर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता 11.30 वा. चे सुमारास 03 संशयीत इसम भिस्तबाग महालासमोर शाईन मोटारसायकलवर येवुन थांबले. पथकातील अधिकारी व अंमलदार असे संशयीत इसमांना ताब्यात घेण्यासाठी जात असतांना त्यांना पोलीस आल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांचेकडील मोटारसायकल चालु करुन ते पळुन जाण्याचे तयारीत असतांना दोन इसमांना जागीच पकडले. व एका इसमाचा पाठलाग करुन पकडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या तिनही इसमांकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये 30 हजार- रुपये किमतीचा गावठी कट्टा, 1 हजार – रुपये किमतीचे 02 जिवंत काडतुसे, व 70हजार रुपये किमतीची विनानंबरची होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल असा 1,01,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे लखन भाऊसाहेब आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द नगर, छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न, फसवणुक, दुखापत, विनयभंग, अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे 6 गुन्हे दाखल आहेत. लखन सरोदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये फसवणूक व अवैध शस्त्रे बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे 3 गुन्हे दाखल आहेत. अविनाश विक्रम आल्हाट हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द नगर जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 2 गुन्हे दाखल आहेत




























































