भांडुपमधील तीन पूल पालिका नव्याने बांधणार! 29 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भांडुप पूर्व येथील धोकादायक झालेले तीन पूल पाडून या ठिकाणी पालिका नव्याने पूल बांधणार आहे. या पुलांसाठी पालिका 29 कोटी 35 लाख 11 हजार रुपयांचा खर्च करणार आहे. यामुळे नागरिक-प्रवाशांची गैरसोय दूर राहणार आहे.

अंधेरीत 3 जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि 14 मार्च 2019 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले. आवश्यक ठिकाणी दुरुस्ती आणि काही पूल पाडून नागरिकांच्या मागणीनुसार काही पूल नवीन बांधण्यात येत आहेत.