पुण्यात क्षुल्लक कारणावरून आई आणि मुलाला मारहाण, रिक्षा आणि बाईकची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात क्षुल्लक कारणावरून तिघांनी तरुणासह त्याच्या आईला मारहाण केली आहे. इतकेच नाही तर आरोपीने रिक्षा आण दुचाकीचीही तोडफोड केली आहे. या प्रकरणी आरोपींनी तीनही आरोपींना अटक केली आहे. आकाश आडाळे, अनुश आडाळे, लशन ठोसर वय अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत अडागळे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत आणि आरोपीची किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. त्या रागातून टोळक्याने अनिकेतसह त्याच्या आईला मारहाण केली. त्यानंतर दुचाकी आणि परिसरातील रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करीत आहेत.