
सामना प्रतिनिधी । नगर
नगर शहरातील लष्करी ठाण्याच्या हद्दीमध्ये संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तिघांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे त्यातील एक जण नगर जिल्ह्यातील अन्य दोन जण परराज्यातील आहेत. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींमध्ये प्रदीप शिंदे, राहणार पारनेर व रिजवान एजाज अली, सोनू चौधरी, राहणार मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
भिंगार कॅम्प परिसरामध्ये लष्कराचे ठाणे आहे. काल रात्रीच्या सुमाराला हे तिघेजण हे लष्कराच्या हद्दीमध्ये घुसले असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या तिघांना पकडले. यातील एकाच्या अंगावर लष्करी ड्रेस होता. ते नेमके कशासाठी आले होते. काय करीत होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.




























































