
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू असून याचाच फायदा घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न दक्ष हिंदुस्थानी लष्कराने उधळून लावला. बारामुल्ला येथे लष्कर आणि दहशतवाद्यांनी धुमश्चक्री उडाली. यात लष्कराला तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.
कश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराची शोधमोहीत तीव्र झाली आहे. कडाक्याची थंडी आणि बर्फवृष्टीचा फायदा घेऊन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जवान रात्रीचा दिवस करत आहेत. अशातच बुधवारी दुपारी बारामुल्ला जिल्ह्यातील बिनेर परिसरात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
Three terrorists killed in an encounter with security forces in Baramula #JammuAndKashmir pic.twitter.com/RWLnXdJ7fz
— ANI (@ANI) January 23, 2019
दरम्यान, याआधी शोपियानममधील हेफ श्रीमल भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.






























































